ही तर फरार आणि बोगस गँग -मुंडे

March 22, 2014 9:40 PM0 commentsViews: 2934

22 मार्च : निवडणुकीच्या रणधुमाळीत बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा वाद रंगलाय. राष्ट्रवादीच्या बीडमधल्या जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी काका गोपीनाथ मुंडेंवर घणाघाती हल्ला केला. गेल्या निवडणुकीत काकांसाठी बोगस मतदानाची जबाबदारी माझ्यावर होती. असा दावा करत धनंजय मुंडेंनी वादाला तोंड फोडलं. तसंच जर लबाडांचं ऑलिम्पिक घेतलं तर गोपीनाथ मुंडेंना पहिलं बक्षीस मिळेल असा हल्लाबोलही केला. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी पुतण्याला उत्तर दिलं. बीडमध्ये आता फरार आणि बोगल लोकांची गँग झाली आहे असा गँगपासून पवारांनी सावध राहावं असा प्रतिटोला त्यांनी लगावला. तसंच धनंजय मुंडेंनी केले आरोप निराधार आहे. बीडच्या राजकारणात आज जी काही शिवराळ भाषा वापरली गेली त्यामुळे आमचे संस्कार पुसले गेले आहे अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली.

close