वरुण गांधींचा माफी मागायला नकार

March 18, 2009 8:38 AM0 commentsViews: 6

18 मार्च भाजपचे युवा उमेदवार वरुण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असं कुठलंही प्रक्षोभक विधान केलं नसल्याचा दावा केला आहे. प्रचार सभेच्या सीडीतला आवाज आपला नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा आपल्याविरुद्धचा राजकीय कट आहे, म्हणून मी माफी मागणार नाही, असं वरुण गांधी यांनी दिल्ली इथे एका पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मतदार संघात भाजपचे तरुण युवा उमेदवार आणि मनेका गांधीचे पुत्र वरुण गांधी यांनी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल,असं भाषण 6 मार्चला प्रचार सभेत केलं होतं. त्या दिवशी पिलीभीत मतदार संघात त्यांनी मुस्लिमांवर टीकेची झोड उठवली होती. सर्व हिंदूना एका बाजूला करून ' उरलेल्यांना ' पाकिस्तानात पाठवायला हवं, असे उद्गार काढल्याचा वरुण गांधी यांच्यावर आरोप आहे. या भाषणाच्या सीडींची नोंद घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पिलीभीत जिल्हाधिका-यांनी कलम 153 – अ, 123 – अ आणि 123 – ब या कलमांखाली अजामीनपात्र गुन्हा आणि भाजपला ही नोटीस बजावली आहे. वरुण गांधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

close