राजस्थानमधून इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना अटक

March 23, 2014 12:51 PM0 commentsViews: 768

terrorist23 मार्च :  इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या चार दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आजराजस्थानमधून अटक केली. या चारदहशतवाद्यांपैकी वकास हा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपी यासीन भटकळचा जवळचा साथीदार असण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दिल्ली पोलिसांनी आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या सहाय्याने हे यश मिळविले.

या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा व दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 24 वर्षीय वकास हा पाकिस्तानी दहशतवादी सप्टेंबर 2010 मध्ये असदुल्ला अख्तर उर्फ हद्दी याच्याबरोबर प्रथम भारतामध्ये आला होता. भटकळ बंगलोरमध्ये ज्या घरात लपून राहिला होता त्याच घरात वकासही होता. वकास पाकिस्तानी नागरिक असल्याचं सांगण्यात येतं आहे. वकासचे अल कायदाशीही संबंध असण्याची शक्यता आहे.

close