मोदींवरून मतभेद

March 23, 2014 12:14 PM0 commentsViews: 581

23 मार्च : विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला असला तरी ते अजूनही राष्ट्रवादीमध्ये आहेत. काल नंदूरबारमध्ये मुलगी हिना गावित हिचा प्रचार करताना त्यांनी मोदींच्या कामाचे गोडवे गायले. तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली आहे.

त्यामुळे एकीकडे पक्षाध्यक्ष मोदींवर टीका करत आहेत, तर मुलगी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्यानं विजयकुमार गावित त्यांची स्तुती करताहेत असा विरोधाभास बघायला मिळाला आहे.

close