द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी ‘हर हर मोदी’ या घोषणेवर घेतला आक्षेप

March 23, 2014 6:12 PM1 commentViews: 659
dwarka shankarachrya23 मार्च : नरेंद्र मोदींच्या सभांचा सध्या देशात धडाका सुरू आहे. या सभांमध्ये ‘हर हर…मोदी….घरं घरं मोदी…’चा नारा घुमू लागला आहे. या घोषणेला द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अक्षेप घेतला आहे. ‘हर हर मोदी’ या घोषणेमुळे हिंदू देवतांचा अवमान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी त्यांची नाराजी थेट राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना फोन करुन कळविली आहे.
”हर-हर’ हा नारा हर-हर महादेव, हर-हर गंगे साठी दिला जातो. कोणत्याही व्यक्तीचे नाव यासोबत जोडून हिंदूच्या धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न होत आहे,’ असं स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे म्हणणे आहे. ‘एका व्यक्तीच्या बाबतील अशी घोषणा दिली जावू नये आणि व्यक्तीपुजाही होऊ नये’ असं शंकराचार्यांनी म्हटल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.
भाजपने केले पडदा टाकण्याचा प्रयत्न
शंकराचार्यांनी हर-हर मोदी घोषणेवर अक्षेप घेतल्यानतंर भाजपने तातडीने प्रतिक्रीया दिली आहे. भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारमन म्हणाल्या, ‘पक्षाने अशी कोणतीही घोषणा दिलेली नाही. तसेच तशा कोणत्याही घोषणेचा प्रचारासाठी वापर होत नाही. लोकांनीच ही घोषणा दिली आहे. ‘
यावर नरेंद्र मोदींनीही ट्विट वरून ‘काही उत्साही समर्थक ‘हर हर मोदी’ या घोषवाक्याचा प्रयोग करतायेत. मी त्यांच्या भावनांचा आदर करतो. पण माझी ही विनंती आह की त्यांनी हे घोषवाक्य भविष्यात वापरू नये’ असं म्हणतं घडलेल्या प्रकारावर लगेचच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
  • Mondrahul

    tyanii Har Har Feku manaila pahijee…….

close