शंकर सारडा यांचा अध्यक्षपदासाठी दावा

March 18, 2009 8:53 AM0 commentsViews: 6

18 मार्च आनंद यादव यांनी 82 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शंकर सारडा यांनी अध्यक्षपदावर दावा केलाय. यापूर्वी शंकर सारडा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आनंद यादव यांचे प्रतिस्पर्धी होते. यादव यांच्या संतसूर्य तुकाराम पुस्तकातील वादग्रस्त विधानांवरुन वारक्र्‍यानी तीव्र आंदोलन केल्यामुळे आनंद यादव यांनी मंगळवारी संध्याकाळी पुण्यात साहित्य परिषदेकडे राजीनामा दिला होता. स्पर्धेत दोनच उमेदवार असल्याने यादव यांच्यानंतर माझाच क्रम लागला पाहिजे या दृष्टीने माझा अध्यक्षपदावरचा दावा योग्य असल्याचं सारडा यांनी म्हटलं आहे. महाबळेश्वर ही माझी कर्मभूमी असल्याने भूमिपुत्र म्हणून माझा हा दावा आणखी मजबूत होतो असंही ते आयबीएन- लोकमतशी बोलताना म्हणाले.

close