प्रचाराचा नवा फंडा

March 23, 2014 6:46 PM0 commentsViews: 618

23 मार्च :   निवडणुकांचा प्रचार तापू लागला आहे. दरवेळेप्रमाणे नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष आपला प्रचार करण्यासाठी नवनवे प्रयोग करताना दिसत आहेत. सध्या बाजारातसुद्धा प्रचाराला उपयोगी पडतील, अशा नवनव्या वस्तू येत आहेत आणि यात मुख्य आकर्षण ठरत आहे, ते पक्षांचा लोगो, निवडणूक चिन्ह, नेत्यांचे फोटो असलेली मोबाइल्सची अनोखी कव्हर्स. मुंबईच्या मनिष मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये असलेल्या या कव्हर्सना गिर्‍हाइकांचीही मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे.

close