नाशिक महामार्गावर डिझेल टॅंकरने घेतला पेट

March 23, 2014 4:25 PM0 commentsViews: 694

nashik blast23 मार्च : नाशिक जिल्ह्यातील सटाण्याजवळ वीरगावजवळ विंचूर- प्रकाशा राज्य महामार्गावर आज दुपारी 3च्या सुमारास इंधनाची वाहतूक करणार्‍या टँकरचा अचानक स्फोट होऊन टँकरने अचानक पेट घेतला.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.  या स्फोटामुळे टँकरजवळच्या एका ट्रकसह दोन मोटार सायकलींनाही आग लागली.
अग्निशामकांनी दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सायंकाळी उशिरानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

close