दोनदा मतदानाचा सल्ला पवारांच्या अंगलट

March 24, 2014 3:24 PM1 commentViews: 1506

sharad pawar4424 मार्च : “आधी सातार्‍याला जाऊन मतदान करा, शाई पुसा नंतर मुंबईला येऊन पुन्हा मतदान करा’ असा अजब सल्ला देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच अडचणीत सापडले आहे.

नवी मुबंईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी दोनदा मतदान करण्यासंबंधी केलेलं वक्तव्य आता त्यांच्या चांगलंच अंगलट आलंय.

आपण हे वक्तव्य विनोदानं केलं होतं, असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांच्या या वक्तव्याची दखल राज्य निवडणूक आयोगानंही घेतली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पवारांच्या रविवारच्या भाषणाची सीडी मागवली आहे.

तर भाजपचे ईशान्य मुंबईतील उमेदवार किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालकांना आज (सोमवारी) निवेदन दिलं आणि पवारांविरोधात तक्रार दाखल केली. तर भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दुसर्‍या राज्यातल्या निवडणूक अधिकार्‍यांना बोलावण्याची मागणी केली आहे.

  • rohit

    aali lahar kela kahar

close