अस्मानी फास सुटेना, आणखी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

March 24, 2014 2:01 PM0 commentsViews: 289

Image img_149012_farmarsusud_240x180.jpg24 मार्च : अस्मानी संकटातून बळीराजा अजूनही सावरला नसून आत्महत्याचे सत्र सुरूच आहे. गारपिटीच्या नुकसानीमुळे आज (सोमवार) सकाळपासून जळगाव आणि बीडमध्ये दोन शेकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातल्या सुरेश पाटील यांनी आत्महत्या केली.

गारपिटीने सुरेश पाटील यांच्या गहू आणि मक्याचं नुकसान झालंय. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव इथंही सोमनाथ काकोट या शेतकर्‍यानं आत्महत्या केली. मोसंबीच्या फळबागा आणि गव्हाचं नुकसान झाल्यानं त्यानं विष पिऊन जीवन संपवलं.

तर रविवारी बीडमध्येच माजलगावमध्ये राजेवाडी इथं बनारसी मुळे या साठ वर्षांच्या शेतकरी महिलेनं स्वत:ला जाळून घेतलं. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गारपिटीमुळे साडे पाच एकरावरील पिकांचं अतोनात नुकसान झालं हे नुकसान कसं भरून काढायचं आणि कर्ज कसं कसं फेडायचं या विवंचनेतून या महिलेनं स्वत:ला जाळून घेतलं. बीडमधील ही सातवी घटना आहे. राज्यभरात आतापर्यंतची 37 शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलंय.

close