‘आधार’च्या सक्तीतून होणार मुक्ती !

March 24, 2014 4:33 PM0 commentsViews: 1665

sc on aadhar card24 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आधार कार्ड योजनेला सुप्रीम कोर्टाने जोरदार धक्का दिला आहे. कोणतीही सेवा मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं करणारे सर्व आदेश सरकारने मागे घ्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहे.

एखाद्याकडे फक्त आधारकार्ड नाही, म्हणून त्या व्यक्तीला त्रास होऊ नये, असं सुप्रीम कोर्टाने बजावलंय. तसंच आधार कार्ड धारकाचा तपशील त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही सरकारी यंत्रणांना देण्यात येऊ नये, असे आदेशही कोर्टाने दिले आहे.

केंद्र सरकारने मोठा गाजावाज करत आधार कार्ड योजना सुरू केली आणि आधार कार्ड बंधनकारक राहिली अशी सक्ती केली. गॅस कनेक्शनपासून ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. केंद्राच्या याविरोधात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला. या अगोदरही सुप्रीम कोर्टाने आधार कार्ड मुख्य ओळखपत्र म्हणून वापरू नये असा निर्णय दिला होता.

close