अखेर राष्ट्रवादीने दाखवला गावितांना बाहेरचा रस्ता !

March 24, 2014 7:54 PM0 commentsViews: 1429

ncp_vijaykumar_gavit24 मार्च : अखेर माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी याबाबत घोषणा केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजयकुमार गावित यांना मंत्रीपद दिले, मोठा मान दिला पण त्यांनी पक्षाचा निर्णय डावलून मनमानी कारभार केला. खुद्द शरद पवार यांनी त्यांची समजूत काढली तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं असं भास्कर जाधव यांनी जाहीर केलं.

विजयकुमार यांची मुलगी हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये अन्यथा कारवाई करू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला होता तरीही गावित यांनी मुलीचं समर्थन करत भाजपमध्ये प्रवेश होऊ दिला. त्यामुळे तात्काळ त्याच दिवशी गावित यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले होते.

पण हे होऊन सुद्धा भाजपच्या एका कार्यक्रमात आपल्या मुलीच्या प्रचारासाठी विजयकुमार गावित हेसुद्धा व्यासपीठावर गेले होते. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीने कारवाईचा बडगा उगारत गावितांना पक्षातून बाहेर काढले आहे.

close