काँग्रेसच्या 48 उमेदवारांची यादी तयार – विलासराव देशमुख

March 18, 2009 11:23 AM0 commentsViews: 6

18 मार्च काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही.पण आता काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी तयार असल्याचं, विलासराव देशमुख यांनी आयबीएन – लोकमतशी बोलताना सांगितलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. त्याविषयी विलासराव म्हणाले, " 2004 च्या 27 – 21 च्या फॉर्म्युल्यामध्ये बदल झाला नसता तर आतापर्यंत दोन्ही पक्ष प्रचारालाही लागले असते. राष्ट्रवादी काँग्रेस ठराविक जागांसाठी अडून बसला आहे. त्याला आम्ही काय करणार ? " काँग्रेसची 48 उमेदवारांची यादी तयार असून दुसरीकडे काँग्रेसची राष्ट्रवादीशी बोलणी चालू आहेत. काँग्रेसच्या या भूमिकेबद्दल बोलताना विलासराव म्हणाले, " ऐन वेळेला राष्ट्रवादीचा उमेदवार मागे फिरला तर आयत्या वेळेला आणायचा कुठून म्हणून आम्ही 48 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आमची स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी आहे. " सत्तेवर असणारे मवाळ विलासराव जागावाटपाच्या मुद्द्यावर कमालीचे आक्रमक झाले आहेत. " योग्य उमेदवाराला तिकीट मिळण्यासाठी हा आक्रमकपणा करावा लागतो, " असं विलासराव सांगितलंय. विलासरावांनी उस्मानाबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. जर हाय कमांडचा आदेश आला तरच निवडणूक लढवणार असल्याचंही ते म्हणाले.

close