रावेरमध्ये जावळेंचा पत्ता कट, रक्षा खडसेंना उमेदवारी

March 24, 2014 6:11 PM0 commentsViews: 1481

raksha khadse24 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघात भाजपने विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात आले आहे.

रावेर मतदारसंघाचे तिकीट अगोदर हरिभाऊ जावळे यांना दिलेलं होते ते आता रद्द करण्यात आलंय. त्यामुळे आता खडसे विरुद्ध जैन असा सामना रंगणार आहे.

हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली असली तरी ते बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मनीष जैन आणि भाजपकडून रक्षा खडसे असा दुरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

close