नितीन पाटील यांना उमेदवारी, उत्तमसिंग पवार बंडाच्या पवित्र्यात

March 24, 2014 8:11 PM0 commentsViews: 972

uttamsingh_pawar_aurangabad24 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने औरंगाबादमधून माजी आमदार नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार उत्तमसिंग पवार नाराज असल्याचे वृत्त असून बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.

औरंगाबादमध्ये काँग्रेसला उमेदवार मिळवण्यास चांगलाच शोधा-शोध घ्यावा लागला. औरंगाबादमध्ये तीन वेळा विजयाची हॅट्‌ट्रिक करणारे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेनं पुन्हा उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण द्यावा याचा शोध काँग्रेस घेत होती.  उमेदवार मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला द्यावी अशी मागणी केली होती.

पण काँग्रेस ही जागा सोडण्यास नकार दिला. अखेर आज (सोमवारी) कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिलीय. पाटील हे कन्नडचे माजी आमदार असून औरंगाबाद मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने उत्तमसिंग पवार नाराज असून बंडखोरीच्या पवित्र्यात आहे. कार्यकर्त्यांशी बोलून उद्या निर्णय घेऊ असं त्यांनी जाहीर केलंय.

close