मोदींनी दाखवला पवारांना कात्रजचा घाट

March 24, 2014 11:05 PM0 commentsViews: 9523

modi_pawar_mahanda milk24 मार्च : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कृषिमंत्री शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा आहे. दुष्काळग्रस्तांसाठी राबवलेल्या मोफत पशुखाद्य योजनेवरून गुजरात सरकारने महानंद डेअरीला साडे 22 कोटी रुपयांची नोटीस पाठवलीय. त्याचबरोबर महानंदला मोफत पशुखाद्य देणार्‍या गुजरातच्या चार संस्थांवरही गुन्हे दाखल केले आहेत.

2013 मध्ये राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या महानंद दूध डेअरीनं मोफत पशुखाद्या योजना राबवली होती. या योजनेसाठी शरद पवार यांच्या आग्रहाखातर गुजरात सरकारने 400 लाख किलो पशुखाद्य मोफत दिल्याची जाहिरातबाजी महानंदनं केली होती.

पण आता नरेंद्र मोदी सरकारनं महानंदला मोफत चारा पुरवणार्‍या 4 संस्थांवर गुन्हे दाखल केले. तसंच महानंद डेअरीला साडे 22 कोटी रुपयांची नोटीसही पाठवण्यात आलीय. महानंदला मिळालेला मोफत पशुखाद्य आता साडे 22 कोटी रुपयांना पडल्यानं महानंदचे धाबे दणाणले आहेत. आता मात्र हे मोफत पशुखाद्य महानंदला महागात पडलंय. या निमित्तानं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी शरद पवारांनाच कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा सुरू झालीय.

 शरद पवारांना कात्रजचा घाट

  • - दुष्काळग्रस्तांसाठी राबवलेली मोफत पशुखाद्य योजना महानंदला पडली महागात
  • - मोफत दिलेल्या 400 लाख किलो पशुखाद्याचे गुजरात सरकारनं मागितले पैसे
  • - साडे बावीस कोटी रुपयांची महानंदला पाठवली नोटीस
  • - मोफत चारा देणार्‍या 4 संस्थांवर केले मोदी सरकारनं गुन्हे दाखल
  • - 2013 मध्ये मोफत पशुखाद्याबद्दल आभार मानणारी जाहिरातही केली होती प्रसिद्ध
  • - मोफत पशुखाद्याबद्दल आभार मानणारी जाहिरतही केली होती प्रसिद्ध

close