पवारांकडून मागितलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण

March 24, 2014 11:07 PM0 commentsViews: 668

Image img_237972_sharadpawaronlbt_240x180.jpg24 मार्च : दोनवेळा मतदान करण्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अंगलट आलंय. शरद पवार यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं प्रथमदर्शनी दिसूनं येतं, असं निवडणूक आयोगाने नमूद केलंय. याबद्दल निवडणूक पवारांना गुरूवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्पष्टीकरण द्यायला सांगितलंय.

रविवारी नवी मुबंईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मतदानाची शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा सल्ला लोकांना दिला होता. यावरून बराच वाद झाल्यानंतर आपण विनोदानं असं म्हटलं होतं, अशी सारसावारव पवारांनी केली.

पण निवडणूक आयोगाने या वक्तव्याची दखल घेऊन पवारांच्या भाषणाची सीडी मागवली.आणि प्रथमदर्शनी त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं दिसत असल्याचं म्हटलं. तर भाजपचे ईशान्य मुंबईतले उमेदवार किरीट सोमैया यांनी पोलीस महासंचालकांना निवेदन दिलं आणि पवारांविरोधात तक्रार दाखल केली.

close