इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या तहसीन अख्तरला अटक

March 25, 2014 2:12 PM0 commentsViews: 289

Tahsin-akhtar25 मार्च :  इंडियन मुजाहिद्दीन(IM) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या तेहसीन अख्तर उर्फ मोनू याला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. यासीन भटकळचा उजवा हात मनला जाणारा तेहसीन पाकिस्तानात पळण्याच्या तयारीत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. नरेंद्र मोदींच्या पाटणा इथल्या सभेच्या ठिकाणी झालेल्या स्फोटाचा तो मास्टरमाईंट होता.

दोनच दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी IMच्या चार दहशतवाद्यांना अटक केली होती. तर आज सकाळी तेहसीनला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाल्याने IMचा कणाच मोडल्याचे मानले जात आहे. यासीन भटकळनंतर इंडियन मुजाहिद्दीनचा मोठा अतिरेकी जेरबंद झाला आहे.

close