ठाण्यातल्या राबोडी परिसरातली परिस्थिती नियंत्रणात

March 18, 2009 2:47 PM0 commentsViews: 3

18 मार्च, ठाणे ठाण्यातल्या राबोडी परिसरातली परिस्थिती आता नियंत्रणाखाली आली आहे. मंगळवारी रात्री ठाण्यातल्या राबोडी परिसरातल्या क्रांती नगर भागातदोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीत सात पोलिसांसह तेरा जण जखमी झाले आहेत. पण आज परिस्थिती आता नियंत्रणाखाली आली आहे. कर्फ्यू हटवण्यात आलाय ठाण्यातल्या राबोडी परिसरात, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कर्फ्यू हटवण्यात आला आहे . जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षा आणि कार दरम्यान झालेल्या अपघातावरून हा वाद सुरू झाला. यानंतर झालेल्या हाणामारीत 8 रिक्षा 3 मोटारसायकल्स जाळण्यात आल्या. तर जमावानं चार घरांसह एक बेकरीही पेटवून दिली होती. या प्रकरणी 30 जणांना अटक करण्यात आली आहे.

close