निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर दरवाढीवर स्थगिती

March 25, 2014 3:16 PM0 commentsViews: 344

Image img_155252_oilrete_240x180.jpg25 मार्च :  नैसर्गिक वायूची दरवाढ करायचा निर्णय स्थगित ठेवत असल्याचं केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाला कळवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं हा निर्णय लांबणीवर टाकला आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून हे दर प्रतियुनिट 4 डॉलरवरून 8 डॉलरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची मंजुरी मागितली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात असल्यानं आयोगानं मंजुरी नाकारली.

मात्र, गॅसचे दर ठरवले नव्हते, फक्त त्यासाठीचा फॉर्म्युला विकसित केल्याचं सरकारनं सुप्रीम कोर्टासमोर सांगितलं. गॅस दरवाढीला मंजुरी देऊ नये अशी मागणी करणार्‍या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहेत. तसंच दरवाढीला मंजुरी दिल्यास आचारसंहितेचं उल्लंघन होईल असा आक्षेप घेत आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

close