ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन

March 25, 2014 2:08 PM0 commentsViews: 366

baby nandan25 मार्च : ज्येष्ठ अभिनेत्री नंदा यांचं वृद्धापकाळानं त्यांच्या राहत्या घरात निधन झालं. त्या 75 वर्षांच्या होत्या. नंदा यांनी बालपणापासूनच सिनेमात अभिनय करणं सुरू केलं होतं, तेव्हापासून त्या बेबी नंदा म्हणून ओळखल्या जायच्या.

छोटी बहन, जब जब फुल खिले, गुमनाम, द ट्रेन, तुफान और दिया असे अनेक सिनेमे त्यांनी गाजवले. चार वेळा त्यांना फिल्म फेअर ऍवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं होतं. तर आंचल सिनेमासाठी त्यांना फिल्म फेअर ऍवॉर्डही मिळालं.

close