राज ठाकरेंची पुण्यात पहिली सभा

March 25, 2014 8:03 PM0 commentsViews: 8653

loksabha_raj25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यातून सुरूवात होणार आहे. यात मनसेच्या काही प्रचारसभांच्या तारखा निश्चित झाल्या आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यातील मुळा-मुठा नदीच्या नदीपात्रात राज ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर मुंबईत 5 एप्रिलनंतर सभा होणार आहे.

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह बाईक आणि कार रॅली काढत अर्ज दाखल केला. पायगुडे यांच्या रॅलीमध्ये शर्मिला ठाकरे उपस्थिती होत्या. राज ठाकरे पुण्यात प्रचारासाठी 3 सभा घेणार आहेत.

गुढीपाडव्याला ते प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली. पुण्यात काँग्रेसकडून वनमंत्री पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे तर युतीकडून अनिल शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे पुण्यातून राज ठाकरे आपल्या सभेला सुरूवात करणार आहे. मुंबईत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख 5 एप्रिलपर्यंत आहे त्यामुळे 5 एप्रिलनंतर मुंबईत सभा घेतल्या जाणार आहे.

close