कुलदीप पवार अनंतात विलीन

March 25, 2014 9:03 PM0 commentsViews: 2880

25 मार्च : ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांच्या पार्थिवावर मुंबईतल्या अंधेरीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. एका हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्यानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलीय. सोमवारी अंधेरीच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. दरोडेखोर, अरे संसार संसार, शापित,मर्दानी, गुपचुप गुपचुप, बिन कामाचा नवरा, आली लहर केला कहर, गोष्ट धमाल नाम्याची, आई तुळजाभवानी, सर्जा, वजीर, आईचा गोंधळ, अशी ज्ञानेश्वरी, घात प्रतिघात, नवरा माझा नवसाचा, जावयाची जात हे त्यांचे सिनेमे चांगलेच गाजले. तर इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, वीज म्हणाली धरतीला, पाखरू, रखेली, निष्कंलक, पती सगळे उचापती या नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. परमवीर आणि विनोदी मालिका तूतूमैंमैं यातही त्यांनी भूमिका साकारल्यात.

close