‘सौंगध मुझे इस मिट्टी की..’,मोदींच्या आवाजात प्रचारगीत

March 25, 2014 11:00 PM0 commentsViews: 2573

25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज (मंगळवारी) निवडणुकीचं प्रचारगीत जारी केलं. ‘सौंगध मुझे इस मिट्टी की, मैं देश नही मिटने दुंगा’ असं या गीताचं नाव आहे. या प्रचारगीतात खुद्द भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचाही आवाज आहे. या प्रचारगीतातून देशातील बेरोजगारी, गरिबी, महिलांची सुरक्षा आणि इतर सामाजिक प्रश्नांवर भाजपने प्रकाश टाकलाय. हे गीत प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांनी गायले आहे. तर प्रसुन जोशी यांनी हे गीत लिहले आहे असून तर संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे.

close