काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीला नकारघंटा

March 25, 2014 11:09 PM0 commentsViews: 1380

manish tiwari_election25 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची धावपळ सर्वच पक्षांची सुरू आहे . पण काँग्रेसच्या गोटात वेगळीच चिंता पसरली आहे. लोकसभेसाठी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनीही निवडणूक लढवायला नकार दिलाय.

काँग्रेस त्यांना चंदिगढमधून तिकीट देण्याची शक्यता होती. पण तिवारी यांनी निवडणूक लढण्यास नकार दिलाय. तर तिकडे बडोद्यात काँग्रेसने आपला उमेदवार बदललाय. राहुल गांधी यांच्या प्रायमरी इलेक्शनमधून निवडून आलेले नरेंद्र रावत यांना बडोद्यातून उमेदवारी देण्यात आली होती.

पण, याठिकाणाहून मोदींविरोधात अधिक सक्षम उमेदवार द्यावा, अशी विनंती खुद्द रावत यांनीच पक्षाध्यक्षांकडे केली आणि त्यानंतर काँग्रेसनं बडोद्यातून मधुसुदन मिस्त्री यांना उमेदवारी दिलीय.

close