सेन्सेक्सने गाठला ऐतिहासिक उच्चांक

March 26, 2014 10:15 AM0 commentsViews: 269

2499922626 मार्च :  मुंबई शेअर बाजाराच्या सुरुवातीलाच आज सेन्सेक्सने इतिहासातला उच्चांक गाठला आहे. यामुळे शेअर बाजाराच तेजी आली आहे.      सेन्सेक्सने 22 हजारांचा आकडा पार करत 22, 162 अंकांपर्यंत पोहचला आहे. तर, निफ्टीने 6,600 अंकापर्यंत मजल मारली आहे.

देशातील लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मुंबई शेअर बाजारात सातत्याने तेजी पहायला मिळत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे परदेशी गुंतवणुकदारांनी कॅश मार्केटमध्ये जोरदार खरेदी केली आहे.

जानेवारी 2014 पासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या कॅश मार्केटमध्ये तब्बल 16 हजार कोटी गुंतवले आहेत. तर याचं दुसरं कारण हे आहे की, मे महिन्यात दिल्लीत स्थिर सरकार येईल अशी आशाही गुंतवणूकदारांमध्ये आहे.

close