अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून भरला उमेदवारी अर्ज

March 26, 2014 12:16 PM0 commentsViews: 832

Image img_43762_ashok_190309_240x180.jpg26 मार्च : आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय वनवास आता संपला आहेलोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माणिकराव ठाकरे, आणि काँग्रेसचे जिल्ह्यातले सर्व आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हजर होते. त्यानंतर त्यांनी शहरामधून जोरदार रॅली काढली, त्यावेळी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण त्यांच्या सोबत होत्या. तसेच पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक यावेळेस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

‘विरोधकांनी कितीही आरोप केले तरी, पक्ष आणि कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचं त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलं’. अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नांदेडमधल्या त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार उत्साह आहे. आज सकाळपासूनच अशोक चव्हाण रिलॅक्स्ड मूडमध्ये होते.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच गुरुद्वारामध्येही माथा टेकला.

दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या उमदेवारीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थातूरमातूर उत्तर देत वेळ मारुन नेली.

निवडणूक लढवण्यास पात्र -अशोक चव्हाण

आपण तिकीट मिळवण्यासाठी हायकमांडवर आपण दबाव आणला नाही. नांदेडमधून लोकसभा निवडणूक जिंकून दाखवणार आणि गेल्या अनेक वर्षांपासून याचा आपल्याला अनुभव आहे. असा विश्वास अशोक चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. तसंच माझ्यावर आरोप जरी असले तरी कायद्याने मी निवडणूक लढवण्यास पात्र आहे. माझ्यावर आरोप अजून सिद्ध झाले नाही. त्यामुळे मला उमेदवारी देण्यासापासून हायकमांडाला कोणीही रोखू शकत नव्हते. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत मी निर्दोष आहे असंही चव्हाण म्हणाले.

close