अरविंद केजरीवाल म्हणजे ‘एके 49′ – मोदी

March 26, 2014 2:46 PM1 commentViews: 2318

26 मार्च :   ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल म्हणजे ‘एके 49′ आहेत, असं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)म्हटलं आहे. केजरीवाल यांनी मोदींवर अनेकदा टीका केली आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच केजरीवाल यांच्यावर जाहीर टीका केली आहे. जम्मू येथे प्रचारसभेदरम्यान बोलताना मोदी म्हणाले, ‘केजरीवाल हे 49 दिवस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी होते. हे 49 दिवस म्हणजे ‘एके 49′ होते. आपल्या देशात तीन ‘एके’ आहेत. ते म्हणजे ‘एके 47′, एके अँथनी आणि ‘एके 49′. या तीन ‘एकें’ पैकी शेवटचा ‘एके’चा नुकताच उदयास आला आहे. ‘एके 49’ने आपल्या संकेतस्थळावर काश्‍मीर पाकिस्तानमध्ये दाखवले होते. यावरूनच काय ते समजते.’ दहशतवाद्यांच्या विरोधात केंद्र सरकार मवाळ असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसला 60 वर्ष दिलीत मला फक्त 60 महिने द्या देशाला दुर्दशेतून बाहेर काढणार असा दावाही त्यांनी केला. प्रचाराच्या दुसरया टप्प्यामध्ये मोदी देशभर एकूण 185 सभा घेणार आहेत. यांपैकी आजची जम्मू येथील पहिली सभा होती.

  • Harshad Deshpande

    ARVIND KEJRIWAL JI is totally lost it. Because when he have told media & all the nation that he takea call from varancy people whether he should stand or not against MODI JI but he haven’t done that. Even many news channels have covered it that the mob which so called supporters of AK49 :) were outsiders from varancy. Then why AK49 is doing this drama being a very poor chapp of AAP.
    Very well said by MODI JI >> AK 49

close