सोनिया गांधींकडून अशोकरावांची ‘आदर्श’ पाठराखण

March 26, 2014 3:42 PM1 commentViews: 701

soniya_gandhi_asohk_chavan26 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आदर्श सोसायटी घोटाळ्यातील आरोपी अशोक चव्हाण यांना तिकीट दिलंय. पण अशोकरावांच्या उमेदवारीचं खुद्द काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पाठराखण केलीय.

काँग्रेसने आज (बुधवारी) निवडणूक जाहिरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पत्रकारांनी आदर्श घोटाळ्यात आरोपी असलेले अशोक चव्हाण यांना उमेदवारी कशी काय देण्यात आली, असा सवाल विचारला. त्यावर सोनिया गांधींनी चव्हाणांची जोरदार पाठराखण केली. “चव्हाण हे दोषी नाहीत आणि कायद्यानं त्यांना निवडणूक लढवायला बंदीही घातलेली नाही,” असं स्पष्टीकरण सोनिया गांधी यांनी दिलं.

मंगळवारी संध्याकाळी अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी अशोकरावांना उमेदवारी देण्याबाबत पक्षाची भूमिका मांडली. अशोक चव्हाण यांचं प्रकरण सुरेश कलमाडी यांच्यापेक्षा वेगळं आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्यापासून रोखले नाही असं माकन यांनी स्पष्ट केलं.

अशोक चव्हाणांचं शक्तीप्रदर्शन

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत माणिकराव ठाकरे, आणि काँग्रेसचे जिल्ह्यातले सर्व आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी हजर होते. त्यानंतर त्यांनी शहरामधून जोरदार रॅली काढून शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण त्यांच्या सोबत होत्या. तसंच पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक यावेळेस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी, पक्ष आणि कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचं त्यांनी या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलं. अशोक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून नांदेडमधल्या त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार उत्साह आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच गुरुद्वारामध्येही माथा टेकला.

  • manoj s.

    congress kadun aapan ajun kay apeksha karnar.. he tar honarach hote.. karan tyanchi reetach ahe hyala jhak tyala kadh.. thodya divsani lok visartil mag kalmadi suddha rajyasabhet jaeel.. pan hya election la jantela murkha samju nakat.. tumcha adarsha jantela changla thauk jhalay.. raga fakta bolto (acting karto) he jantela kalale ahe.. kejri ani team hya aadarsh ani nanded baddal bhumika ka nahi mandat, tyanchya pakshacha janma bhrashtachar rokhanya sathi jhala hota naa??

close