‘नो वोट’च्या तरतुदीवरून काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं राजकारण

March 17, 2009 3:27 PM0 commentsViews: 3

17 मार्च, मुंबईअलका धुपकर मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाच्या बेबसाईटवर 'नो वोट' या तरतुदीबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याला काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने विरोध केला. निवडणूक लढवणारा कोणताच उमेदवार मतदाराला पसंद पडला नसेल तर त्याला मत न देण्याचा अधिकार आहे. पण काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना एनएसयुआयने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे नो वोट कँम्पेनविरोधात तक्रार केली. पण राजकीय पक्षांनी कितीही विरोध केला तरीही नो वोटबद्दल जनतेला माहिती देण्याचा निर्णय विभागप्रमुखांनी घेतला आहे. काँग्रसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयुआय संघटनेचे अध्यक्ष सदाफ अबोली यांच्या मते नो वोट कॅम्पेन हे विद्यार्थी आणि इतर नागरिकांची दिशाभूल करणारं आहे. " विद्यापीठाच्या नो वोट या नावाला आक्षेप घेत लोक मत द्यायला बाहेरच पडणार नाहीत. " असं एनएसयुआय संघटनेचे अध्यक्ष सदाफ अबोली यांनी म्हटलं आहे.एनएसयुआयच्या तक्रारीनंतर ही लिंक मागे घेण्यात आली, असा दावाही सदाफ अबोली यांनी केला आहे. आमच्या तक्रारीनंतंर ही लिंक रद्द झाली होती, असंही ते म्हणाले. पण प्रत्यक्षात विद्यापीठाचं म्हणणं वेगळं आहे. " त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. त्यांनी नीट अभ्यास केलेला नाही. " असं म्हणणं विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा. अरुण सावंत यांचं आहे. " ' नो वोट ' म्हणजे निगेटिव्ह मत नाही. न्यूट्रल मत तर नाहीच नाही, " विद्यापीठाच्या मासकॉम विभागाचे प्रकुलगुरू संजय रानडे म्हणाले. राजकीय पक्षांना लोकं जागलेले नको आहेत.. आंबेडकर म्हणाले होते की, जागे व्हा तेच या राजकीय पक्षांना नकोय. mcjmumbai.org या वेबसाईटवरून बरंच राजकारण खेळलं जात असलं तरी नो वोटची खरी ताकद म्हणजे यामुळे बोगस मतदान कमी होतं.तुम्ही मतदानाला गेलात नाही तर तुमच्या जागेवर कोणीतरी दुसरं मत देणार. त्याऐवजी तुम्ही प्रोटस्ट नो वोट करा आणि तुमचा हक्क तुम्ही बजावला, " अशी माहिती अग्नी संस्थेच्या जेम्स जॉन यांनी दिली. कोणत्याही उमेदवाराल मत द्या किंवा तुमचं निषेध मतं नोंदवा. पण मतदान करायला विसरू नका.काय आहे नॉट टू वोटिंगतुम्हाला राजकारण्यांबद्दल चीड आहे. किंवा मत देण्यासाठी तुम्हाला कुठलाच राजकारणी योग्य वाटत नसेल. तर मतदानावर बहिष्कार न टाकता तुम्ही नॉट टू वोटिंगचा पर्याय स्वीकारू शकता. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार 49 ओ खाली नॉट टू वोटची तरतूद आहे. कसं करतात नॉट टू वोटिंग – 1) मतदाराने मतदान केंद्रावर जावं.2) मतदानासाठी बोटावर शाई लावून घ्यावी.3) त्यानंतर ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनकडे जावं.4) कोणतंही बटन प्रेस न करता परत मतदान अधिकार्‍याकडे यावं.5) मतदार अधिकार्‍याला सांगावं की, मला कोणालाच मतदान करायचं नाही.6) अशा मतदारांसाठी निवडणूक केंद्रावर फॉर्म 17 अ भरून घेतला जातो.7) मतदान न करता घरात बसण्याऐवजी नो वोटींगचा पर्याय केव्हाही चांगला.10) यामुळे बोगस मतदानाला आळा बसतो.

close