राखी सावंतही निवडणुकीच्या रिंगणात

March 26, 2014 2:46 PM0 commentsViews: 3690

26 मार्च : बॉलिवूडची आयटम गॅर्ल आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी राखी सावंतही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय. उत्तर-पश्चिम मुंबईतून ती निवडणूक लढणार आहे. अपक्ष म्हणून राखी सावंत निवडणूक लढवणार आहे. आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन राखीने आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र आपला पक्ष कोणता असणार हे मात्र तिने सांगितलं नाही. येत्या एक दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाच नाव जाहीर करू असं राखीने स्पष्ट केलं. तसंच उत्तर-पश्चिम मुंबईतून आपण जिंकून येऊ असा विश्वासही राखीने व्यक्त केला. विशेष म्हणजे उत्तर-पश्चिम मुंबईतून काँग्रेसकडून गुरूदास कामत तर शिवसेनेकडून गजानन किर्तीकर निवडणूक लढवत आहे. तसंच याच मतदारसंघात आम आदमी पार्टीचे मुंबईचे समन्वयक मयांक गांधी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. आणि मनसेकडून अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर या मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. आता या चौरंगी लढतीत आता राखी सावंतने उडी घेतलीय. आता मतदारसंघात प्रचाराची धामधूम काही असो पण प्रचाराची रंगत चांगलीच असणार हे नक्की.

close