हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी 8 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

March 26, 2014 5:20 PM0 commentsViews: 232

salman_khan_hit_&_run26 मार्च : 2002 च्या हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावरच्या खटल्याची आज (बुधवारी) सुनावणी झाली. साक्षीदार गैरहजर राहिल्याने सुनावणी 8 एप्रिलपर्यंत पुढे ढकललीय.

सलमानवर आधी निष्काळजीपणाने गाडी चालवण्याचा गुन्हा होता. नंतर त्याच्यावर अधिक गंभीर असा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लावण्यात आला. त्यामुळे त्याच्याविरोधातला खटला नव्याने सुरू करावा असा आदेश कोर्टाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिला होता. त्यानुसार आज या खटल्याची सुनावणी झाली.

हिट अँड रन प्रकरणी सलमामन खानवर आयपीसी 304 (2) या कलमानुसार सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आलाय. मुंबईक 2002 साठी सलमानं भरधाव गाडी चालवून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले होते. या प्रकरणी त्याच्यावर रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आयपीसी 304 (2) नुसार सदोष मनुष्यवधाच्या गुन्हाखाली खटला दाखल करण्यात आला. या खटल्यात जर सलमान खान दोषी आढळला तर त्याला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

close