महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव

March 17, 2009 3:30 PM0 commentsViews: 6

17 मार्चमहिलांच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सुपर सिक्समध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. भारताने ठेवलंलं 208 रन्सचं टार्गेट न्यूझीलंडने 48 ओव्हर्समध्येच पाच विकेट राखून पार केलं. केट पुलफोर्ड आणि सुझी बेट्स यांनी न्यूझीलंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. याआधी न्यूझीलंड बॉलर्सनी भारतीय बॅट्समनला पीटवर टीकू दिलं नाही. भारताला मिळालेल्या सुरूवातीच्या झटक्यामुळे त्यांची अवस्था होती 62 रन्सवर तीन विकेट. त्यानंतर अंजुम चोप्राने भारताचा डाव सावरत कारकिर्दीतली 17वी हाफ सेंच्युरी ठोकली. या पराभवामुळे फायनलमध्ये जाण्याच्या भारताच्या आशा अंधुक झाल्यात. फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला आता पुढची मॅच तर जिंकावी लागणारच आहे पण त्याचबरोबर दुसर्‍या मॅचेसच्या निकालावरही त्यांचं भवितव्य अवलंबुन असणार आहे.

close