मोदींची विचारसरणी देशाला धोकादायक -राहुल गांधी

March 26, 2014 7:02 PM1 commentViews: 598

26 मार्च : नरेंद्र मोदी हे ऐका विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात. निवडक लोकांची मोदींची विचारधारा आहे, एकमेकांमध्ये भांडणं लावणारी विचारधारा आहे. ही विचारधारा देशाचं नुकसान करणारी आहे अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर केली. तसंच इंडिया शायनिंग चांगली योजना होती पण तिचा फुगा फुटला हे सर्व देशातील जनतेनं पाहिलं आणि आता यावेळीही असंच होईल टोलाही राहुल यांनी भाजपला लगावला. आज (बुधवारी) काँग्रेसने आपला जाहिरनामा जाहीर केला. यावेळी राहुल गांधी बोलत होते.

  • Amit Shinkar

    राहुल गांधी स्वतः वैचारिक गोन्धळात सापडलेले आहेत…….. आदर्श प्रकरणातील सूत्रधार अशोकराव, शिंदे आणि इतर नेते यांना पाठीशी घालताना कुठली लाभदायक विचारसरणी आचरणात आणली होती आपण???

close