आधी 10 हजार कोटी भरा तरच सुटका, कोर्टाने रॉय यांना बजावले

March 26, 2014 7:26 PM0 commentsViews: 674

subroto roy26 मार्च : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना अखेर सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला. पण, त्यांनी आधी 10 हजार कोटी रुपये भरावे, त्यानंतरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी अट ही सुप्रीम कोर्टाने टाकलीय.

सहारा समुहाला गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटींपेक्षा जास्त देणी द्यायची आहेत. याप्रकरणी सुब्रतो रॉय यांना अटक झालीय आणि ते 4 मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. पण, ही अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणत सहाराकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी थकवल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना वारंवार कोर्टाने हजर राहण्यात बाबत नोटीस बजावली. पण रॉय यांनी कोर्टाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली. अखेर कोर्टाने 28 फेब्रुवारीला सुब्रतो रॉय यांच्याविरोधात कोर्टाने अजामिनपात्र अटकवॉरंट जारी केलं.

अटक केल्यानंतर सहाराश्रींची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. मध्यंतरी सुब्रतो रॉय यांनी कोर्टात हात जोडून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. दोन महिन्यात देणेकरांचे पैसे परत करू अशी ग्वाहीही रॉय यांनी दिली. पण सुब्रतो रॉय यांनी कोर्टाचा मान राखला नाही, अशा शब्दांत कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सुब्रतो रॉय यांनी आपली सुटका करून घेण्यासाठी वारंवार कोर्टाचे दार ठोठावले. अखेर आज कोर्टाने सुब्रतो रॉय यांना अंतरिम जामीन मंजूर केला पण 10 हजार कोटी भरण्याची अट घातली आहे.

close