जळगावमध्ये तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

March 26, 2014 7:38 PM0 commentsViews: 440

farmer suicide26 मार्च : अस्मानी संकट अजूनही बळीराजाचा पाठलाग सोडायचा नाव घेत नाहीय. राज्यभरात शेतकर्‍यांचं आत्महत्या सत्र सुरूच आहे. जळगाव जिल्ह्यात आज (बुधवारी) सकाळपासून आणखी 3 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलीय.

चाळीसगाव, अमळनेर आणि धरणगाव तालुक्यातल्या तीन शेतकर्‍यांनी आपलं जीवन संपवलंय. अमळेनर तालुक्यातील डांगरी गावातील आनंदराव कुमावत या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केलीय.

त्यांनी नापिकी शेती आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. तर धरणगावच्या साकरे गावातल्या सुरेश पाटील या गारपीटग्रस्त शेतकर्‍याने विष पिऊन आत्महत्या केली. चाळीसगावमधल्या हरी पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोसायटीचं कर्ज आणि वीज कनेक्शन तोडल्याने हरी पाटील यांनी आत्महत्या केली. एकट्या जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 14 आत्महत्या झाल्या आहेत.

close