…त्यामुळेच शिवसेनेत अस्वस्थ -रामदास कदम

March 26, 2014 9:40 PM0 commentsViews: 5853

news_ramads_kadam_sena26 मार्च : शिवसेनेचे नेते रामदास कदम नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पण खुद्द रामदास कदम यांनी आपली नाराजी आता स्पष्टपणे व्यक्त केलीय. आपल्याविरोधात पक्ष आणि पक्षाबाहेर षड्‌यंत्र होत आहे, पाच वर्षात पक्ष आणि पक्षाबाहेरील या षड्‌यंत्रामुळे हैराण झालोय आयबीएन लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत रामदास कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

तसंच काहीजण आपल्यात आणि शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुहागरमध्ये पक्षातल्याच नेत्यांनी पाय ओढले, असा आरोप त्यांनी अनंत गीतेंवर नाव न घेता केलाय. अनंत गीतेंचा प्रचार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. गुहागरमध्ये माझे पाय ओढण्यात पक्षातील नेते होते. मी गितेेंचा प्रचार करणार नाही यावर अजूनही ठाम आहे. असा रोखठोक हल्ला शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनंत गितेंवर चढवलाय.

गुहागर मध्ये विनय नातूंना कुणी उभं केल? माझ्या प्रचाराच्या आड नातूंचा प्रचार झाला? कुणाच्या वाड्यावर कुठं बैठका झाल्या.? मुंबईतून माझ्याविरोधात कार्यकर्ते कसे आणले गेेले ? हे सर्व समोर आणेन. असा इशारा रामदास कदम यांनी दिलाय. आयबीएन लोकमत ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी गिते आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. तसंच माझ्यात आणि शिवसैनिकात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं सांगत हिंमत असेल तर समोरून या पण राजकीय भवितव्याशी खेळू नका असं आव्हानही कदम यांनी विरोधकांना दिलंय.

close