चव्हाणांच्या उमेदवारीचं समर्थन

March 26, 2014 9:57 PM0 commentsViews: 817

26 मार्च : अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेताना काँग्रेसने सगळ्या बाबींचा विचार केलेला असणारच आहे. अशोक चव्हाणांना उमेदवारी दिल्यामुळे आघाडीलाच काय तर काँग्रेसलाही कोणता फटका बसेल असं वाटत नाही असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. पुण्यामध्ये आज सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

close