‘त्या’वक्तव्याबद्दल खेद, पण आता विषय संपवा-पवार

March 26, 2014 11:13 PM1 commentViews: 1404

23_news_sharad_pawar_news26 मार्च : “सातार्‍यात 17 तारखेला घडाळ्यावर शिक्का हाणा आणि मुंबईत 24 तारखेला पहिली शाई पुसून पुन्हा घड्याळाला मतदान करा” असा अजब सल्ला देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आता आपल्या या व्यक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी दोनदा मतदानासंबंधी केलेल्या वक्तव्याबद्दल आज (बुधवारी) निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्यामुळे जो गोंधळ उडाला आणि गैरसमज झाला, त्याबद्दल आपल्याला अत्यंत खेद होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा मुद्दा इथेच संपवावा, अशी विनंतीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलीय.

नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात शरद पवार यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गेल्यावेळी साताराच्या आणि मुंबईची निवडणूक एकाचवेळी आली होती. पण आता यावेळी सातार्‍यात 17 तारखेला मतदान आहे आणि मुंबईला 24 तारखेला आहे. त्यामुळे तिथे घड्याळावर शिक्का हाणायचा आणि नंतर इथेही शिक्का हाणायचा फक्त पहिली शाई पुसून टाका नाहीतर घोटाळा व्हायचा असा अजब सल्ला पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. प्रथमदर्शनी हा आचारसंहितेचा भंग असल्याचं सांगत निवडणूक आयोगानं पवारांकडून स्पष्टीकरण मागितलं होतं.

  • pratap

    do bakbak first then say sorry it is congress culture..

close