शेतकर्‍यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच, आकडा 46 वर

March 27, 2014 3:35 PM0 commentsViews: 213

234marathvada_farmar27 मार्च : राज्यात गारपिटीमुळे शेतकर्‍यांचं आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. राज्यभरात शेतकर्‍यांची आत्महत्येची संख्या 46 वर पोहचली आहे.

बुधवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यात 5 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. बुधवारी संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात पिंपळगाव खुर्द इथं विजय रासपुते या शेतकर्‍यानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केलीये. त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून कर्ज होतं. त्यातच गारपिटीनं रासपुते यांच्या शेतीचं नुकसानं झालं. तर जळगावच्याच सारोळा गावात प्रताप काटे या शेतकर्‍यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

त्यांच्यावरही दोन ते अडीच लाखांचं कर्ज होतं. मात्र यंदा गारपिटीनं नुकसान झाल्यानं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यातूनच नैराश्यानं त्यांनी आत्महत्या केली. तर बीड जिल्ह्यात आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. धारूर तालुक्यात रामराव कारभारी बडे या शेतकर्‍याने विष घेऊन आत्महत्या केली. बडे यांच्यावर 1 लाखांचं कर्ज होतं त्यातच गारपिटीमुळे शेती उद्धवस्त झाली. त्यामुळे हतबल होऊन बडे यांनी आत्महत्या केली. बीडमध्ये एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांना आत्महत्या केलीय. राज्यभरात शेतकर्‍यांची आत्महत्येची संख्या 46 वर पोहचली आहे. अजून किती आत्महत्या झाल्यावर मदत मिळणार असा सवाल पीडित शेतकरी विचारत आहेत.

close