26/11 च्या पुराव्यासंदर्भातलं कुठलंही चित्रीकरण दाखवण्यावर कोर्टाची बंदी

March 19, 2009 7:50 AM0 commentsViews: 1

19 मार्च, मुंबई सुधाकर कांबळे मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या अतिरेकी हल्ल्याबाबत मीडियावर काही निर्बंध घालणारी एक ऑर्डर आर्थर रोड स्पेशल कोर्टानं जारी केली आहे. तशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आयबीएन-लोकमतला दिली. या सरकारी ऑर्डरनुसार 26/11 च्या हल्ल्याबाबत कोणताही नवीन व्हिडिओ किंवा साक्षिदाराबाबतची बातमी टीव्हीवर दाखवता किंवा वर्तमानपत्रात छापता येणार नाही. कारण त्यांचा साक्षीपुराव्यांवर परिणाम होऊ शकतो. मीडियाच्या सततच्या हस्तक्षेपामुळे 26/11 च्या हल्ल्याच्या केसमध्ये अडथळे निर्माण होतायत, अशी एक याचिका मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचनं स्पेशल कोर्टाकडं केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टानं सदर आदेश दिलेत. त्यामुळं आता 26/11 च्या हल्ल्यांचे पुरावे आणि साक्षीदारांबाबत कोणतीही नवीन बातमी टीव्हीवर दाखवल्यास किंवा वर्तमानपत्रात छापल्यास त्या रिपोर्टर आणि मीडिया हाऊसवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

close