झालेल्या चुकांचा विचार करा, पवारांच्या ठाकरेंना कानपिचक्या

March 27, 2014 4:32 PM0 commentsViews: 3083

pawaronudhav27 मार्च :  शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये इतर पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यावरून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठतेय. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर टीका केलीय.

अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार पक्ष सोडून इतरत्र जाण्याचा विचार करतात याचा अर्थ त्या पक्षाच्या नेतृत्वावर विचार करण्याची वेळ आलेली आहे, आपल्याकडून भुतकाळात काही चुका झाल्या आहेत की काय त्यामुळे ही गळती सुरू झाली आहे. पण याचे उत्तर त्यांना मिळणार नाही असा टोला शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लगावलाय.

तसंच पवारांनी पुन्हा एकदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ज्यांना देशाचा इतिहास माहित नाही ते देशाचे पंतप्रधान बनायला निघाले आहे अशी बोचरी टीका पवारांनी केली. राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी डोंबिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

 

close