विनायक मेटे महायुतीच्या वाटेवर ?

March 27, 2014 7:30 PM1 commentViews: 3794

vinayak mete27 मार्च : पाच पांडवांच्या महायुतीत सहावा पक्ष येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना महायुतीत घ्यावं का, यासंदर्भात शिवसेना, भाजप आणि रिपाईंचे प्रयत्न सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समाजाबरोबर मराठा समाजाची जोड मिळाली तर सत्तेचं समीकरण मांडता येतं, हा प्रयत्न 1995 मध्ये यशस्वी झाल्यानंतर युतीची सत्ता आली होती. तोच प्रयत्न भाजप आणि शिवसेनेकडून पुन्हा केला जातोय.

त्यामुळे मराठा समाजाचे नेते विनायक मेटेंना सोबत घेऊन 95चं समीकरण मांडता येऊ शकेल, यासाठी युतीच्या नेत्यांची बैठक होतेय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे गेले काही दिवस विनायक मेटे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचं चित्र समोर आलंय. एवढंच नाही मेटे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगला होता. या प्रकरणी मेटेंना पक्षाने नोटीसही बजावली होती. त्यामुळे आता मेटे महायुतीच्या वाटेवर असल्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

  • suraj jadhav

    ja mete saheb ,pavar gharan nahi denar aarakshan…
    tum age bado hum tumhare saath hai,,…

close