योगेश घोलप घेणार उमेदवारी अर्ज मागे

March 27, 2014 9:53 PM0 commentsViews: 1665

yogesh_gholap27 मार्च : शिवसेनेचे नेते बबनराव घोलप यांचा मुलगा योगेश घोलप यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं जाहीर केलंय.

 

अवैध पद्धतीने संपत्ती जमवल्या प्रकरणी बबनराव घोलपांना तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्यांची शिर्डीतली उमेदवारी अडचणीत आली.

 

यानंतर बुधवारी योगेश घोलप यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. आता ते उद्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.

close