गॅलेक्सी s5 भारतात लॉन्च

March 28, 2014 10:39 AM0 commentsViews: 2144

भारतीय बाजारात आपले वर्चस्व सिद्ध करणार्‍या ‘सॅमसंग’चा जनरेशन नेक्स्टचा स्मार्टफोन ‘गॅलेक्सी S5′ गुरुवारी लॉन्‍च झाला. ‘स्लमडॉग मिलियनेयर’च्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पोहोचलेली  भारतीय अभिनेत्री फ्रीडा पिंटोच्या हस्ते गॅलेक्सी S5 लॉन्‍च करण्यात आला.

गॅलेक्सी S5 चे वैशिष्ट्ये म्हणजे यात फिंगरप्रिंट आणि हार्ट रेट सेंसर बसविले आहे. याशिवाय गॅलक्‍सी S5 चा कॅमेरा 16 मेगापिक्‍सलचा असून तो 4K रिझोल्‍यूशनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो.

सॅमसंग ‘गॅलेक्सी S5’ची तब्बल 50,000  रूपये किंमत आहे.

फीचर्स-

 • डिस्‍प्‍ले: 5.1 इंच सुपर अमोलेड (1080 X 1920p) डिस्‍प्‍ले हा गैलेक्‍सी S4 सारखा आहे
 • ऑपरेटिंग सिस्‍टम: एंड्रॉइड 4.4.2 (किटकॅट)
 • हार्डवेअर: एक्जिनोज ऑक्‍टा कोर प्रोसेसर, 2 जीबी रॅम
 • स्‍टोरेज: 16 जीबी आणि 32 जीबी+ माइक्रोएसडी स्‍लॉट ( 64 GB पर्यंत मेमरी कार्डचा वापर करुन मेमरी वाढवण्‍याची सुविधा)
 • 2.5 GHz चे स्नैपड्रॅगन प्रोसेसर
 • 2800 mAh बॅटरी
 • 145 ग्रॅम वजन
 • अल्‍ट्रा पॉवर सेविंग मोड्स

 

कॅमेरा
16 मेगापिक्‍सलचा कॅमेरा गॅलक्‍सी मोबाईलमध्‍ये पहिल्‍या वेळेस वापरण्‍यात आला आहे. त्‍याचबरोबर hd मध्‍ये व्हि‍डिओ रेकॉर्डिंची सुविधाही देण्‍यात आली आहे. या  ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन तंत्रज्ञानामुळे उत्तम क्वॉलिटीचे फोटो काढता येतील.

डिझाईन

 • मोबाईलच्‍या मागील बाजूला एक हार्ट रेट मॉनिटर लावले गेले आहे.
 • गॅलक्‍सी S5 मध्‍ये हेल्‍थ आणि फिटनेस अँपसुध्‍दा आहेत.
 • गॅलक्‍सी S5 चार रंगांमध्‍ये लॉन्‍च करण्‍यात आला आहे.
 • मोबाईल्‍या समोरील बाजूला होम बटन असून सोबत फिंगरप्रिंट स्‍कॅनरही दिला आहे.

कनेक्टिविटी-

 • 4G LTE फीचर
 • 802.11ac वाई-फाई
 •  डाउनलोड बूस्टर नामक नवे फीचर यामध्‍ये अंतभूत आहे. वाय- फाय आणि LTE कनेक्शन, यांना एकसोबत कनेक्‍ट होऊ शकते.
वॉटर प्रूफ आणि प्रूफ

 • सॅमसंग गॅलक्‍सीने S5 हा मोबाईल वॉटर प्रूफ आणि प्रूफ बनविला आहे. पाण्‍यामध्‍ये 3 फुटापर्येत अर्धा तास आपण यावर काम करू शकतो.

कमतरता

 • सॅमसंग गॅलक्‍सी S5 मध्‍ये प्‍लास्टिक बॉडीचा वापर करण्‍यात आला आहे.
 • डिस्‍प्‍लेचे रिझोल्‍यूशन त्‍या मानाने कमी आहे.

बायोमॅट्रिक फीचर्ससारखे ‘आयरिस कंट्रोल’ (आय सेंसर) आणि फिंगर प्रिंट स्कॅनरशिवाय हा फोन शानदार गॅलेक्सी गिअर स्मार्टवॉचसोबत लॉन्च झाला आहे.

close