वडिलांनीच केला मुलींवर बलात्कार

March 19, 2009 10:06 AM0 commentsViews: 1

19 मार्च श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी वडिलांनीच मुलीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. मुंबईतल्या मिरारोड परिसरात ही घटना घडली. झटपट श्रीमंत होण्यासाठी, एका मांत्रिकाने, वडिलांनाच स्वत:च्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवायला सांगितले. त्यानंतर गेली दहावर्ष या बापानं मोठ्या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्या मांत्रिकाने लहान मुलीशीही वडिलांना शारीरिक संबंध ठेवायला सांगितलं.आपल्या लहान बहीणचंही आयुष्यही उध्वस्त होतं आहे, हे बघितल्यानंतर मोठ्या मुलीनं आपल्या मामाला याबाबत सांगितलं. त्यानंतर ही बाब उघडकीला आली. तांत्रिक हसमुख राठोड आणि मुलींच्या आई-वडलांना अटक करण्यात आली आहे. गेली नऊ वर्ष हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढं आली आहे. अनेकवेळा या तांत्रिकानंही बलात्कार केल्याचं मुलींनी सांगितलं आहे.

close