‘सुपर हर्क्युलस’ विमानाला अपघात; ५ ठार

March 28, 2014 2:13 PM0 commentsViews: 1098

army_128 मार्च :  ग्वाल्हेरजवळ एअर फोर्सचं ‘सुपर हर्क्युलस सी-130जे’ या विमानाला अपघात झाला आहे.  हे विमान माल वाहतुकीसाठी वापरलं जात होतं. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेश- राजस्थान सीमेवर हे हेलिकॉप्टर कोसळले.  या विमानाने सकाळी दहा वाजता आगर्‍याहून उड्डाण केलं होतं. अपघाताच्या वेळी हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

close