15 एप्रिलपासून ‘मोनो’ धावणार 14 तास

March 28, 2014 2:21 PM0 commentsViews: 585

28 मार्च : मोनोचा पहिला टप्पा चेंबूर ते वडाळा काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला. त्यावेळ मुंबईकरांनी मोनोला भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे आता मुंबईकरांसाठी सध्या 8 तास धावणारी मोनो 15 एप्रिलपासून 14 तास धावण्याची शक्यता आहे. तसे संकेत एमएमआरडीएच्या वतीनं देण्यात आलेत. सुरूवातीच्या आराखड्याप्रमाणे हा बदल केला जाणार आहे. सध्या मोनो सकाळी 7 ते 3 अशी 8 तास धावते ती 15 एप्रिलपासून सकाळी 6 ते रात्री 8 अशी 14 तास धावणार असल्याची माहिती मिळतेय.

close