मोदींना जीव मारण्याची काँग्रेस उमेदवाराची धमकी

March 28, 2014 3:06 PM0 commentsViews: 2813

028 मार्च :  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच काही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरमधले काँग्रेसचे उमेदवार इम्रान मसूद यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडालीय. या सभेदरम्यान बोलताना मेहसूद यांनी मोदी यांचे तुकडे तुकडे करुन टाकेन, अशी धमकी दिली. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानं खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगानेही या भाषणाची गंभीर दखल घेतली आहे. मेहसूद यांच्या भाषणाची निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केली असून त्यांच्या भाषणाची सीडी मागवलीय.

दरम्यान काँग्रेसनं मसूद यांच्या भाषणाचा निषेध केला आहे.

close