शरद पवारांची पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार

March 19, 2009 12:59 PM0 commentsViews: 1

19 मार्च राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. पंतप्रधानपदासाठी लागणारं आवश्यक संख्याबळ माझ्याकडे नसल्याची मला चांगली जाणीव आहे. त्यामुळे मी पंतप्रधान होऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं. बुधवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि विलासरावराव देशमुख उपस्थित होते. त्यावेळी पवरांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मागं यावं, असा दबाव टाकल्यांचंही बोललं जात आहे.

close